आमचा इतिहास

“परंपरेची पायवाट, गौरवशाली वारसा आणि संस्कारांची शिदोरी.”

“शौर्य, संस्कार आणि समाजसेवेची परंपरा — हाच आमचा इतिहास.”

WhatsApp Image 2025-11-10 at 5.08.22 PM

स्व. श्री. चिंतामण हरी महाले (नांदगाव)

WhatsApp Image 2025-11-20 at 8.05.26 PM (1)

स्व. श्री. पांडुरंग अनंत पाटील (कपासे)

       सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या स्थापनेत दानशूर वृत्ती, समाजप्रेम आणि शिक्षणाबद्दल अनन्यसाधारण तळमळ असणाऱ्या उदार व्यक्ती कै. चिंतामण हरी महाले (नांदगाव) यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी त्यांनी संस्थेस मौजे नवली येथील सर्वे क्र. ७८/अ, ११११, क्षेत्रफळ २७ गुंठे इतकी स्थावर मालमत्ता देणगीस्वरूपात अर्पण केली, ज्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस भक्कम पाया लाभला.

                        तत्पूर्वी, संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कै. पांडुरंग अनंत पाटील कपासे (सफाळे) यांनी पाच एकर तेरा गुंठे एवढे विशाल जमीनक्षेत्र उदार मनाने दान करून संस्थेच्या विस्तारयोजनेत अमूल्य हातभार लावला.                        या दोन्ही मान्यवरांच्या देवदत्त दानशीलतेमुळे संस्थेचे आजचे कार्य उभे राहिले असून त्यांच्या सद्गुणांची परंपरा आजही संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला प्रेरणा देत आहे.

वसतिगृहासाठीची जमीन संस्थेस दिनांक ३१/०८/१९५९ रोजी कै. चिंतामण हरी महाले यांच्या वारसांकडून आणि मंडळाचे तत्कालीन विश्वस्त यांच्या उपस्थितीत बक्षीसपत्र/करारपत्राद्वारे सुपूर्द करण्यात आली. सदर व्यवहार बक्षीसपत्र क्र. ५३३१/१७/१९५९, दिनांक ३१/०८/१९५९ प्रमाणे नोंद करण्यात आला.

त्या वेळचे मंडळाचे विश्वस्त पुढीलप्रमाणे होते:
१) श्री. श्रीधर माणिकराव पाटील, दादर
२) श्री. भालचंद्र पांडुरंग पाटील, कपासे
३) श्री. मोहन रामचंद्र धुरू, दादर
४) श्री. रवींद्र बाळाराम धुरू, दादर
५) श्री. देवजी हरिश्चंद्र राऊळ, दादर

वरील देणगीसंबंधी जमीन, इमारत व वास्तू यांची माहिती तत्कालीन नोंदींप्रमाणे पुढीलप्रमाणे सादर केली आहे.

सदर जमिनीचा ७/१२ उतारा प्रारंभी श्रीमती द्वारकाबाई चिंतामण महाले आणि श्रीमती दमयंतीबाई चिंतामण महाले यांच्या नावावर होता. त्यानंतर बक्षीसपत्रातील तरतुदीनुसार सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या नावे ७/१२ उताऱ्यात फेरफार करण्यात आला.

यानंतर, संस्थेच्या विनंतीनुसार संबंधित जमीन विश्वस्तांच्या नावावर फेरफार करण्यात आली असल्याची नोंद उपलब्ध आहे.

संस्थेची स्थापना : १९१४

नोंदणी क्रमांक : ऐ. ११७१(मुंबई)

संस्थेचे आद्य संस्थापक

आद्य सहकारी:

कै. हरिश्चंद्र लक्ष्मण कवळी (जेपी) मुंबई

कै. रघुनाथ पद्माकर वैद्य (भादवे )

कै. हरिश्चंद्र महादेव चुरी (मुंबई)

कै. खंडेराव विठोबा कोरे (मुंबई)

आद्य संस्थापक:

कै. काशिनाथ देवजी धुरू (जेपी) मुंबई 

कै. पांडुरंग अनंत पाटील (कपासे)

कै. महादेव नारायण पाटील (खटाळी)

आद्य संस्थापक सचिव:

कै. भास्कर कृष्णा पाटील (भादवे)

संग्रहित माहिती आणि इतिहास समाजाचा

सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या स्थापना तारखेपासून पासून आज पर्यंतच्या घटनेची नोंद (तारखेसह) ज्ञात असावी म्हणून पुढील प्रमाणे माहिती देत आहोत.

१. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाची स्थापना दिनांक २२ / ११ / १९१४

२. संस्थेचे नाव सूर्यवंशी क्षत्रिय शेती-शिक्षण फंड त्यानंतर श्री सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ आणि सन १९५१ पुढे संस्थेचे नाव सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ अशा प्रकारे संस्थेचे नाव बदलण्यात आले.

३. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाची दिनांक ०३ डिसेंबर १९३३ मध्ये संस्थेची घटना के. रामचंद्र दादाजी कवळी, अॅड. विठोबा देसाई यांनी नेमलेल्या कमिटीचा अहवाल सन १९४० च्या वार्षिक सर्व साधारण सभेनी (अ.स.स.) मंजुरी दिली. आणि सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ १९४० च्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम ५० अ (१) अन्वये अर्ज क्र. ५५ / १९८६ ने दिनांक २३ डिसेंबर १९८६ रोजीच्या निकालाने धर्मदय आयुक्त मुंबई यांचेकडे नोंदणीत आले. क. ए. १९७१ मुंबई सुधारित योजना (नियमावली) घटना दुरुस्ती दि. २५ मे २००९ रोजी झालेली आहे.

४. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा १९१४ साली घटाळी येथे झाली आहे.

५. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचा सुवर्ण महोत्सव २४ मे १९६४ रोजी दादोबा काशीनाथ ठाकूर वस्तीगृह नवली पटांगणात भव्य प्रमाणात संपन्न झाला.

६. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचा अमृत महोत्सवी समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्व. ना. शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत दि. २७ फेब्रुवारी १९८८ रोजी मुंबई येथे संपन्न झाला.

७. वाणगाव येथील दि. २३ एप्रिल १९२२ च्या परिषदेमध्ये मंडळाच्या कार्याला उर्जा मिळाली. सफाळे येथील कपाशी गावातील कै. पांडुरंग अनंत पाटील यांनी एकूण ५ एकर १३ गुंठे जमीन उदार अंतःकरणाने सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाला दिली. या जमिनीचे बक्षीस पत्र दि. १२ नोव्हेंबर १९२३ रोजी संस्थेस बक्षीसपत्र रजिस्टर करून दिले. पांडुरंग बाग कपाशी येथील १३ गुंठे जमीन दि. ५ / ०३ / १९५५ रोजी बिगरशेती प्लॉट (NA) झालेली आहे.

८. दि. ५ / ०३ / १९५५ सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचे कै. काशीनाथ देवजी धुरू अध्यक्ष यांनी रु. ८२३७-८ आणे देणगी देऊन एकूण १०६१४ रु. इतका खर्च करून पांडुरंग बागेत वस्तीगृह बांधण्यात आले. त्या वस्तीगृहास कै. काशीनाथ देवजी धुरू वस्तीगृहाची कोनशीला दि. २० / ०४ / १९२६ रोजी बसविण्यात आली.

९. कै. चिंतामण हरी महाले कुटुंबियांनी क्षेत्र २७ गुंठे जमीन मंडळाला विनामूल्य दिली. त्या जमिनीचे बक्षीस पत्र दि. २२ / ०४ / १९५९ रोजी दिलेले आहे.

१०. नवली पालघर येथील के. दादोबा काशीनाथ ठाकूर वस्तीगृहाचे उद्घाटन तत्कालीन महसूल मंत्री मा. ना. भाऊसाहेब वर्तक यांच्या शुभहस्ते दि. २२ / ०४ / १९६२ रोजी झालेले आहे.

११. के. दादोबा काशीनाथ ठाकूर वसतिगृहाची नवीन इमारत बांधकाम करून जुनी इमारत मोडण्यात आली. दिनांक २२ / ०४ / २००६ शरयूताई गोविंदराव ठाकूर आणि ठाकूर कुटुंबीय अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त, यांचे अनुमतीने / मंजुरीने दि. ०७ / १२ / २००५ रोजी नवीन करारपत्र रजिस्टर करण्यात आले आहे.

१२. नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन दि. १३ / ०४ / २००५ रोजी तत्कालीन अध्यक्ष श्री भालचंद्र मुकुंद पाटील व सचिव श्री जयंत पांडुरंग देसले व ठाकूर कुटुंबीय आणि मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

१३. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचे शताब्दी वर्ष समारंभ दि. २३ / ११ / २०१४ रोजी पालघर येथील आर्यन एज्युकेशन शाळेच्या मैदानात संपन्न झाला. आणि शताब्दी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा घटाळी गटातील उसरणी येथे २४ / २५ मे २०१४ रोजी झालेली आहे.

१४. सूर्योदय शिक्षण संस्थेची स्थापना दि. १५ / ०६ / २००० रोजी नोंदणी क्रमांक एक २६३ मुंबई.

१५. नवली पालघर नवीन इमारतीचे उद्घाटन दि. २९ / १२ / २००८ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. विलासराव देशमुख, ठाकूर कुटुंबीय मंडळाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आणि शरयूताई गोविंदराव ठाकूर यांनी सदरची इमारत दि. ०३ / ०४ / २००९ रोजी सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या ताब्यात दिली. विश्वस्तासमवेत करारपत्र झालेले आहे.


संपर्क : जयंत पांडुरंग देसले (९८२३२३१२३६)

माजी विश्वस्त, अध्यक्ष, सचिवगण, सल्लागार, इतिहासकार

सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ
Scroll to Top