मनोगत

“समाजउन्नतीच्या वाटचालीवर चिंतन आणि प्रेरणादायी विचार.”

मनोगत
श्री यदुनाथ पुरूषोत्तम पाटील (अध्यक्ष)

माझ्या तमाम समाज बंधू आणि भगिनींनो आपणास नमस्कार कळविण्यास आनंद होतो की काळाच्या गरजे नुसार आपणासही बदलणे गरजेचे असुन त्यानुसार आम्ही कार्यकारणी बैठकीत निर्णय घेऊन वेबसाईट सुरू केली आहे या बद्दल खूप खूप आनंद होत आहे. आपल्या पूर्वजांनी (आद्य संस्थापक) आपल्या मंडळास समाजास सुधारून तसेच एकत्र आणण्या साठी १९१४ साली खटाळी गटात मंडळाची स्थापना केली. संस्थापकानी लावलेले रोपट्याचे आज वटरुक्ष झाला आहे. त्याची प्रसिद्धी आपण जग भर कामधंद्यासाठी ,शिक्षणासाठी गेलेल्या समाज बांधवांना आपल्या समाजाबद्दल असलेली माहिती तसेच आपले उपक्रम समजावे हाच माझा अध्यक्ष या नात्याने छोटासा प्रयत्न आहे. समाजाचा सूर्यतेज हे त्रियमासिक समाजभूषण कै. श्री यदुनाथ पांडुरंग देसले यांनी सुरू केलेले आहेच. परंतू आज संगणक युगात तसेच मोबाईलच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज हित साधून हा छोटासा प्रयत्न आपणा पर्यंत ठेवत आहे. त्यास समाज बंधू आणि भगिनींनो विनंती की आपली स्वतःची कामधंद्याची / प्रसिद्धीची जाहिरात सुद्धा देऊन कळत नकळत त्यास हातभार लावावा ही कळकळीची नम्र विनंती.

आपला विश्वासू

श्री यदुनाथ पुरुषोत्तम पाटील.

अध्यक्ष,सुर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ

श्री प्रकाश वासुदेव राऊत (सरचिटणीस)
सन्माननीय ज्ञाति बंधू–भगिनी, सप्रेम वंदे. सन १९१४ मध्ये आमच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाची पायाभरणी झाली. त्या काळातील उदार, दूरदृष्टी असलेल्या आणि शिक्षणाबद्दल अपार तळमळ असणाऱ्या व्यक्तींनी संस्थेची भक्कम उभारणी केली. विशेषतः कै. चिंतामण हरी महाले (नांदगाव) व कै. पांडुरंग अनंत पाटील कपासे यांनी दानशूर वृत्तीने संस्थेसाठी स्थावर जमिनीची देणगी देऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निस्वार्थ योगदान दिले. मंडळाचे तत्कालीन विश्वस्त आणि पदाधिकारी यांनी संस्थेच्या विकासासाठी अथक परिश्रम घेत इमारत व वास्तू उभारण्याचे महत्वाचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांचे योगदान आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. आजची पिढी अधिक तंत्रज्ञानाभिमुख होत आहे. येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता — AI चा काळ असेल, यात शंका नाही. त्यामुळे नवीन पिढीला संस्थेशी जोडून ठेवण्यासाठी आणि आपल्या समाजाचा इतिहास, उपक्रम, सेवा यांची माहिती व्यापक पातळीवर पोहोचवण्यासाठी वेबसाइट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. नवीन पिढीतील उद्योजक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि समाजातील प्रतिभावंत व्यक्तींना एकमेकांशी जोडण्यासाठी आम्ही वेबसाइटच्या माध्यमातून एक सामूहिक व्यासपीठ तयार करत आहोत. यामुळे समाजातील कौशल्ये, संधी आणि संसाधने एकत्र येतील आणि आपल्या समाजाच्या प्रगतीला नवे दिशा-मार्ग मिळतील. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने संस्थेचा विकास अधिक वेगाने साध्य होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

श्री.प्रकाश वासुदेव राऊत

सरचिटणीस,सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळ

Scroll to Top