संस्थेचे उद्देश
Objectives of the Institution ►
संस्थेचे उद्देश
१) सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीच्या सर्वसाधारण जनतेची सर्वांगीण उन्नती करणे.
२) शेतकी शिक्षण तसेच प्राथमिक, द्वितीय, उच्च व औद्योगिक शिक्षणाचा प्रसार करणे,उत्तेजन देणे आणि शक्य झाल्यास आर्थिक मदत करणे.
३) ज्ञातीतील विध्यार्थी तसेच तरुण-तरुणींच्या क्रीडा व कलागुणांना उत्तेजन देऊन शक्य तसा आर्थिक सहाय्य करणे.
४) गरीब व गरजूंना वैद्यकीय व आर्थिक मदत करणे व तत्सम कार्य करणे.
५) बदलत्या कालमानाप्रमाणे चालीरीती सुधारणे , समाजाचे राहणीमान वाढविण्यास झटणे व इतर आवश्यक असे कार्य हाती घेऊन समाजाचा हित साधणे.
६) ग्रामीण भागातील जातिबांधवांच्या लोकोउपयोगी मंडळास व संधास उत्तेजन देणे, शक्य झाल्यास आर्थिक मदत करणे.
७) वरील उद्देश यशस्वी रीतीने पार पाडण्यास आवश्यक वाटल्यास सरकारच्या विकास अथवा तत्सम योजनांबरोबर सहकार्य करणे.