“शौर्य, संस्कार आणि समाजसेवेची परंपरा — हाच आमचा इतिहास.”
सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या स्थापनेत दानशूर वृत्ती, समाजप्रेम आणि शिक्षणाबद्दल अनन्यसाधारण तळमळ असणाऱ्या उदार व्यक्ती कै. चिंतामण हरी महाले (नांदगाव) यांचे योगदान अत्यंत मोलाचे व इतिहासात अजरामर असे आहे.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि भावी पिढ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य संस्थेच्या प्रगतीचा भक्कम पाया ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी कै. चिंतामण हरी महाले यांनी संस्थेस मौजे नवली येथील सर्वे क्र. ७८/अ, ११११, क्षेत्रफळ २७ गुंठे इतकी मौल्यवान स्थावर मालमत्ता देणगीस्वरूपात अर्पण केली. या उदार देणगीतून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस दिशा व बळ प्राप्त झाले.
तत्पूर्वी, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कै. पांडुरंग अनंत पाटील कपासे (सफाळे) यांनी पाच एकर तेरा गुंठे एवढे विशाल जमीनक्षेत्र अत्यंत उदार मनाने दान करून संस्थेच्या विस्तारयोजनेत अमूल्य हातभार लावला. या दोन्ही थोर दानशूर व्यक्तींच्या देवदत्त दानशीलतेमुळेच संस्थेचे आजचे भक्कम स्वरूप साकार झाले असून, त्यांच्या सद्गुणांची परंपरा आजही संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला प्रेरणा देत आहे. याच दानपरंपरेतील एक तेजस्वी नाव म्हणजे कै. शरयूताई गोविंदराव ठाकूर. शरयूताई या समाजातील सर्वश्रेष्ठ दानशूर भगिनी होत्या. त्यांच्या दानशूर वृत्तीची असंख्य उदाहरणे समाजास ज्ञात आहेत. पानशेत धरण दुर्घटना असो, कोयना भूकंप असो अथवा दुष्काळग्रस्त भाग असो—आपत्तीच्या प्रत्येक प्रसंगी त्यांचा आर्थिक मदतीचा हात सदैव मोकळा राहिला. दानशूरपणाचे जिवंत व चिरंतन साक्ष देणारे रु. ८० लाख खर्चून उभारलेले पालघर येथील स्व. दादोबा काशिनाथ ठाकूर विद्यार्थी वसतिगृह व स्व. गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह, हे कै. चिंतामण हरी महाले बागेत आजही भव्य स्वरूपात उभे आहे. “यावत चंद्रौ दिवाकरौ” असे म्हणतात; चंद्र-सूर्य आणि सूर्यवंशी क्षत्रिय समाज अस्तित्वात असेपर्यंत शरयूताईंचे नाव अजरामर राहील. समाज त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही. वसतिगृहासाठीची जमीन संस्थेस दिनांक ३१/०८/१९५९ रोजी कै. चिंतामण हरी महाले यांच्या वारसांकडून आणि मंडळाचे तत्कालीन विश्वस्त यांच्या उपस्थितीत बक्षीसपत्र / करारपत्राद्वारे सुपूर्द करण्यात आली. सदर व्यवहार बक्षीसपत्र क्र. ५३३१/१७/१९५९, दिनांक ३१/०८/१९५९ प्रमाणे विधिवत नोंद करण्यात आला.त्या वेळचे मंडळाचे विश्वस्त पुढीलप्रमाणे होते—
१) श्री. श्रीधर माणिकराव पाटील, दादर
२) श्री. भालचंद्र पांडुरंग पाटील, कपासे
३) श्री. मोहन रामचंद्र धुरू, दादर
४) श्री. रवींद्र बाळाराम धुरू, दादर
५) श्री. देवजी हरिश्चंद्र राऊळ, दादर
वरील देणगीसंबंधी जमीन, इमारत व वास्तू यांची माहिती तत्कालीन अधिकृत नोंदींप्रमाणे पुढीलप्रमाणे उपलब्ध आहे. सदर जमिनीचा ७/१२ उतारा प्रारंभी श्रीमती द्वारकाबाई चिंतामण महाले आणि श्रीमती दमयंतीबाई चिंतामण महाले यांच्या नावावर होता. त्यानंतर बक्षीसपत्रातील तरतुदीनुसार सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या नावाने ७/१२ उताऱ्यात विधिवत फेरफार करण्यात आला. यानंतर संस्थेच्या विनंतीनुसार संबंधित जमीन मंडळाच्या विश्वस्तांच्या नावावर फेरफार करण्यात आल्याची नोंदही उपलब्ध आहे. या सर्व दानशूर व्यक्तींच्या त्याग, दूरदृष्टी आणि समाजनिष्ठेमुळेच सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ आज भक्कमपणे उभे असून, समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी निरंतर कार्यरत आहे.
संस्थेची स्थापना : १९१४
नोंदणी क्रमांक : ऐ. ११७१(मुंबई)
संस्थेचे आद्य संस्थापक
आद्य सहकारी:
कै. हरिश्चंद्र लक्ष्मण कवळी (जेपी) मुंबई
कै. रघुनाथ पद्माकर वैद्य (भादवे )
कै. हरिश्चंद्र महादेव चुरी (मुंबई)
कै. खंडेराव विठोबा कोरे (मुंबई)
आद्य संस्थापक:
कै. काशिनाथ देवजी धुरू (जेपी) मुंबई
कै. पांडुरंग अनंत पाटील (कपासे)
कै. महादेव नारायण पाटील (खटाळी)
आद्य संस्थापक सचिव:
कै. भास्कर कृष्णा पाटील (भादवे)
संग्रहित माहिती आणि इतिहास समाजाचा
सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या स्थापना तारखेपासून पासून आज पर्यंतच्या घटनेची नोंद (तारखेसह) ज्ञात असावी म्हणून पुढील प्रमाणे माहिती देत आहोत.
१. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाची स्थापना दिनांक २२ / ११ / १९१४
२. संस्थेचे नाव सूर्यवंशी क्षत्रिय शेती-शिक्षण फंड त्यानंतर श्री सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ आणि सन १९५१ पुढे संस्थेचे नाव सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ अशा प्रकारे संस्थेचे नाव बदलण्यात आले.
३. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाची दिनांक ०३ डिसेंबर १९३३ मध्ये संस्थेची घटना के. रामचंद्र दादाजी कवळी, अॅड. विठोबा देसाई यांनी नेमलेल्या कमिटीचा अहवाल सन १९४० च्या वार्षिक सर्व साधारण सभेनी (अ.स.स.) मंजुरी दिली. आणि सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळ १९४० च्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम ५० अ (१) अन्वये अर्ज क्र. ५५ / १९८६ ने दिनांक २३ डिसेंबर १९८६ रोजीच्या निकालाने धर्मदय आयुक्त मुंबई यांचेकडे नोंदणीत आले. क. ए. १९७१ मुंबई सुधारित योजना (नियमावली) घटना दुरुस्ती दि. २५ मे २००९ रोजी झालेली आहे.
४. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा १९१४ साली खटाळी येथे झाली आहे.
५. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचा सुवर्ण महोत्सव २४ मे १९६४ रोजी दादोबा काशीनाथ ठाकूर वस्तीगृह नवली पटांगणात भव्य प्रमाणात संपन्न झाला.
६. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचा अमृत महोत्सवी समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्व. ना. शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत दि. २७ फेब्रुवारी १९८८ रोजी मुंबई येथे संपन्न झाला.
७. वाणगाव येथील दि. २३ एप्रिल १९२२ च्या परिषदेमध्ये मंडळाच्या कार्याला उर्जा मिळाली. सफाळे येथील कपाशी गावातील कै. पांडुरंग अनंत पाटील यांनी एकूण ५ एकर १३ गुंठे जमीन उदार अंतःकरणाने सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाला दिली. या जमिनीचे बक्षीस पत्र दि. १२ नोव्हेंबर १९२३ रोजी संस्थेस बक्षीसपत्र रजिस्टर करून दिले. पांडुरंग बाग कपाशी येथील १३ गुंठे जमीन दि. ५ / ०३ / १९५५ रोजी बिगरशेती प्लॉट (NA) झालेली आहे.
८. दि. ५ / ०३ / १९५५ सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचे कै. काशीनाथ देवजी धुरू अध्यक्ष यांनी रु. ८२३७-८ आणे देणगी देऊन एकूण १०६१४ रु. इतका खर्च करून पांडुरंग बागेत वस्तीगृह बांधण्यात आले. त्या वस्तीगृहास कै. काशीनाथ देवजी धुरू वस्तीगृहाची कोनशीला दि. २० / ०४ / १९२६ रोजी बसविण्यात आली.
९. कै. चिंतामण हरी महाले कुटुंबियांनी क्षेत्र २७ गुंठे जमीन मंडळाला विनामूल्य दिली. त्या जमिनीचे बक्षीस पत्र दि. २२ / ०४ / १९५९ रोजी दिलेले आहे.
१०. नवली पालघर येथील के. दादोबा काशीनाथ ठाकूर वस्तीगृहाचे उद्घाटन तत्कालीन महसूल मंत्री मा. ना. भाऊसाहेब वर्तक यांच्या शुभहस्ते दि. २२ / ०४ / १९६२ रोजी झालेले आहे.
११. के. दादोबा काशीनाथ ठाकूर वसतिगृहाची नवीन इमारत बांधकाम करून जुनी इमारत मोडण्यात आली. दिनांक २२ / ०४ / २००६ शरयूताई गोविंदराव ठाकूर आणि ठाकूर कुटुंबीय अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त, यांचे अनुमतीने / मंजुरीने दि. ०७ / १२ / २००५ रोजी नवीन करारपत्र रजिस्टर करण्यात आले आहे.
१२. नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन दि. १३ / ०४ / २००५ रोजी तत्कालीन अध्यक्ष श्री भालचंद्र मुकुंद पाटील व सचिव श्री जयंत पांडुरंग देसले व ठाकूर कुटुंबीय आणि मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
१३. सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाचे शताब्दी वर्ष समारंभ दि. २३ / ११ / २०१४ रोजी पालघर येथील आर्यन एज्युकेशन शाळेच्या मैदानात संपन्न झाला. आणि शताब्दी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा खटाळी गटातील उसरणी येथे २४ / २५ मे २०१४ रोजी झालेली आहे.
१४. सूर्योदय शिक्षण संस्थेची स्थापना दि. १५ / ०६ / २००० रोजी नोंदणी क्रमांक एक २६३ मुंबई.
१५. नवली पालघर नवीन इमारतीचे उद्घाटन दि. २९ / १२ / २००८ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. विलासराव देशमुख, ठाकूर कुटुंबीय मंडळाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आणि शरयूताई गोविंदराव ठाकूर यांनी सदरची इमारत दि. ०३ / ०४ / २००९ रोजी सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळाच्या ताब्यात दिली. विश्वस्तासमवेत करारपत्र झालेले आहे.
संपर्क : जयंत पांडुरंग देसले (९८२३४२२७२६)
माजी विश्वस्त, अध्यक्ष, सचिवगण, सल्लागार, बोलीभाषा लेखक
सूर्यवंशी क्षत्रिय जातिहितवर्धक मंडळसूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ
अध्यक्ष
| अ.क्र. | पदाधिकारी नाव | पद कालावधी | जन्म | निधन |
|---|---|---|---|---|
| १ | कै. काशिनाथ देवजी धुरू | १९१४ - १९३७ | ०७/०७/१८४९ | १७/०९/१९२८ |
| २ | कै. हरिश्चंद्र दादाजी कवळी | १९३७ - १९४४ | १७/०२/१८६० | २५/०५/१९२२ |
| ३ | कै. भालचंद्र पांडुरंग पाटील | १९४४ - १९४५ | १७/०५/१९२३ | ०२/०९/१९६७ |
| ४ | कै. केशवराव पांडुरंग धुरू | १९४५ - १९५० | २०/०३/१८७१ | १०/०१/१९३६ |
| ५ | कै. दादोबा काशिनाथ ठाकूर | १९५० - १९५६ | २९/११/१८८९ | १४/०१/१९५७ |
| ६ | कै. रामचंद्र दादाजी कवळी | १९५६ - १९६१ | १७/०४/१८६७ | ०४/११/१९५२ |
| ७ | कै. मोहन रामचंद्र धुरू | १९६१ - १९६४ | २३/१०/१९१६ | ०३/१२/१९९५ |
| ८ | कै. भालचंद्र पांडुरंग पाटील | १९६५ | १७/०५/१८९३ | ०२/०९/१९६७ |
| ९ | कै. विनायक पांडुरंग राऊत | १९७२ - १९७८ | १७/०५/१९३१ | २९/०७/१९७९ |
| १० | कै. महादेव नारायण महाले | १९७९ | १६/१२/१९०७ | १३/०८/१९९१ |
| ११ | कै. भाऊराव भालचंद्र पाटील | १९८० - १९८३ | २९/०४/१९२९ | ०२/०७/२०१८ |
| १२ | कै. दिनकर देवजी पाटील | १९८४ | १९/०६/१८९७ | २१/१०/१९६७ |
| १३ | कै. लक्ष्मण हिराजी राऊळ | १९८५/८६ - १९९०/९१ | २१/०२/१९२१ | २०/०३/२००४ |
| १४ | श्री. राजाराम गोविंद पाटील | १९८७ - ९३ | २३/११/१९३५ | - |
| १५ | कै. रमाकांत काशिनाथ पाटील | १९९१ - १९९२ | १४/०२/१९२५ | १८/०१/२००२ |
| १६ | कै. जगन्नाथ हरी दळवी | १९९३ - १९९५ | २०/०१/१९३७ | ३०/०५/२०१५ |
| १७ | कै. ॲड. लक्ष्मण भालचंद्र चोरघे | १९९५ - १९९६ | ०२/०२/१९२५ | १८/१०/२०१६ |
| १८ | श्री. विश्वनाथ चिंतामण वैद्य | १९९६ - १९९८ | ०८/०१/१९३६ | - |
| १९ | श्री. कमळाकर गणपत पाटील | १९९८ - २००१ | १२/०७/१९४० | - |
| २० | कै. नारायण हरी पाटील | २००१ - २००२ | १८/११/१९२२ | १३/०१/२०२२ |
| २१ | कै. गंगाराम चिंतामण पाटील | २००२ - २००४ | ३०/१२/१९३२ | २६/०८/२०१८ |
| २२ | श्री. भालचंद्र मुकुंद पाटील | २००४ - २००५ | १५/०७/१९३९ | - |
| २३ | श्री. जयंत पांडुरंग देसले | २००५ - २००६ | २४/०६/१९४८ | - |
| २४ | कै. नागेश रामचंद्र राऊळ | २००६/०७ - २००८/०९ | १०/०७/१९५७ | ०३/०१/२०२४ |
| २५ | श्री. अशोक लक्ष्मण ठाकूर | २००९ - २०१३ | ११/१२/१९५५ | - |
| २६ | श्री. मार्तंड काशिनाथ पाटील | २०१४ - २०१६ | १०/०९/१९५९ | - |
| २७ | श्री. जितेंद्र रामचंद्र राऊळ | २०१६ - २०१८ | ३०/११/१९५४ | - |
| २८ | श्री. विष्णूकांत तुकाराम राऊळ | २००८ - २०१९ | ०९/१२/१९५४ | - |
| २९ | श्री. गंगाराम दत्तात्रय घरत | २०१९ - २०२२ | ०१/०६/१९६० | - |
| ३० | श्री. संतोष कृष्णा पावडे | २०२२ - २०२४ | ०१/०६/१९६९ | - |
| ३१ | श्री. यदुनाथ पुरुषोत्तम पाटील | १३/०७/२०२४ - | २४/०४/१९६२ | - |
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ विश्वस्थ
| अ.क्र. | पदाधिकारी नाव | पद कालावधी | जन्म | निधन |
|---|---|---|---|---|
| १ | कै. भालचंद्र पांडुरंग पाटील | १९७१-१९९५, १९५६-१९६०, १९६१-१९७० | १७/०५/१८९३ | ०२/०९/१९६७ |
| २ | कै. बाळाराम काशिनाथ धुरू | १९५१ - १९७० | १०/०५/१८८० | २३/०३/१९४१ |
| ३ | कै. हरिश्चंद्र महादेव चुरी | १९५१ - १९७० | ११/१०/१८६० | १५/०७/१९२६ |
| ४ | कै. रामचंद्र दादाजी कवळी | १९५१ - १९७० | १७/०४/१८६७ | ०४/११/१९५२ |
| ५ | कै. सखराम रघुनाथ वैद्य | १९५१ - १९७० | १५/०५/१९०३ | ०४/०४/१९७४ |
| ६ | कै. रवींद्र बाळाराम धुरू | १९७६ - १९८० | १९/०५/१९२७ | २८/०२/२०११ |
| ७ | कै. दादोबा काशिनाथ ठाकूर | १९५६ - १९६० | २९/१२/१८८९ | १४/०१/१९५७ |
| ८ | कै. मोहन रामचंद्र धुरू | १९५६ - १९८० | २३/१०/१९१६ | ०३/१२/१९९५ |
| ९ | कै. श्रीधर माणिक पाटील | १९६१ - १९७० | १५/११/१८८० | १८/०८/१९४७ |
| १० | कै. देवजी हरिश्चंद्र राऊळ | १९६१-७०, १९८१-८९ | १०/०८/१८९७ | २७/०७/१९५७ |
| ११ | कै. भाऊराव भालचंद्र पाटील | १९७१-१९८०, १९८६-२००० | २९/०४/१९२९ | ०२/०७/२०१८ |
| १२ | कै. शांताराम बापुजी जाधव | १९७१ - १९८० | ०३/०५/१९३७ | २७/१०/२०२५ |
| १३ | कै. दिनकर देवजी पाटील | १९७१ - १९८० | १९/०६/१८९७ | २१/१०/१९६७ |
| १४ | कै. रमाकांत काशिनाथ पाटील | १९८१-८५, १९८६-९०, १९९६-२००० | १४/०२/१९२५ | १८/०१/२००२ |
| १५ | कै. गोविंद रघुनाथ वैद्य | १९८१-८५, १९८६-९० | ०२/०९/१९०९ | ०६/०७/२००२ |
| १६ | कै. हरिभाऊ बळवंत पाटील | १९८१ - १९८५ | ०२/११/१९१७ | ०२/०७/२००४ |
| १७ | कै. वसंत कृष्णाजी पवार | १९८६ - १९९० | २७/०४/१९६७ | - |
| १८ | कै. केशव अर्जुन राऊत | १९८६ - १९९० | २५/०५/१९२१ | १४/०५/२००४ |
| १९ | श्री. कमळाकर रघुनाथ पाटील | १९८६ - १९९० | ०३/०४/१९४४ | - |
| २० | कै. ॲड. लक्ष्मण भालचंद्र चोरघे | १९९० - १९९५ | ०२/०२/१९२५ | १८/१०/२०१६ |
| २१ | कै. गंगाधर रामचंद्र कवळी | १९९० - १९९५ | १७/०४/१८६२ | २०/१२/१९३७ |
| २२ | श्री. जगन्नाथ आत्माराम पावडे | १९९०-१९९५, १९९६-२००० | ११/०५/१९४४ | - |
| २३ | कै. लक्ष्मण हिराजी राऊळ | १९९०-१९९५, १९९६-२००० | २१/१२/१९२१ | २०/०३/२००४ |
| २४ | श्री. अरविंद लक्ष्मण पाटील | १९९६-२०००, २०००-२००५, २००५-२०१० | २७/११/१९४५ | - |
| २५ | श्री. विश्वनाथ चिंतामण वैद्य | २०००-२०१० | ०८/०१/१९३६ | - |
| २६ | कै. यदुनाथ पांडुरंग देसले | २०००-२००५ | २२/१०/१९४४ | ११/०९/२०२० |
| २७ | श्री. वासुदेव लाला पाटील | २०००-२०२२ | ११/१०/१९५४ | - |
| २८ | श्री. अजित महादेव राऊत | २०००-२००५, २०१६-२०२२ | २६/०२/१९५५ | - |
| २९ | श्री. भालचंद्र मुकुंद पाटील | २००५-२०१० | १५/०७/१९३९ | - |
| ३० | श्री. कमळाकर गणपत पाटील | २००५-२०१० | १२/०७/१९४० | - |
| ३१ | श्री. जितेंद्र रामचंद्र राऊळ | २००५ - २०१० | ३०/११/१९५४ | - |
| ३२ | श्री. जयंत पांडुरंग देसले | २०१० - २०१६ | २४/०६/१९४८ | - |
| ३३ | कै. शरयूताई गोविंदराव ठाकूर | २०१० - २०१६ | १४/०९/१९२० | ०४/०३/२०११ |
| ३४ | कै. नागेश रामचंद्र राऊळ | २०१० - २०१६ | १०/०७/१९५७ | ०३/०१/२०२४ |
| ३५ | कै. मोरेश्वर गोपाळ ठाकूर | २०१० - २०१६ | ०१/०९/१९४३ | १०/१०/२०१७ |
| ३६ | श्री. दिपक दादोबा ठाकूर | २०१० - २०१६ | ०८/०४/१९४६ | - |
| ३७ | सौ. सुरेखा भरत राऊळ | २०१६ - २०२२ | ०८/०८/१९६४ | - |
| ३८ | कै. मधुकर हरिश्चंद्र पाटील | २०१६ - २०२२ | १७/०७/१९५३ | १३/०५/२०२१ |
| ३९ | श्री. रमेश वामन घरत | २०१६ - २०२२, ०९/०७/२०२२ - आतापर्यंत | २६/०३/१९४८ | - |
| ४० | श्री. अशोक लक्ष्मण ठाकूर | ०९/०७/२०२२ - | ११/१२/१९५५ | - |
| ४१ | श्री. विष्णुकांत तुकाराम राऊळ | ०९/०७/२०२२ - | ०९/१२/१९५४ | - |
| ४२ | श्री. शरद काशिनाथ पाटील | ०९/०७/२०२२ - | ०१/०६/१९५४ | - |
| ४३ | श्री. विजय बाबुराव पाटील | - | ०२/०६/१९५३ | - |
| ४४ | श्री. विवेक परशुराम कोरे | - | १३/०७/१९६६ | - |
| ४५ | श्री. दिपक दादोबा ठाकूर | - | ०८/०४/१९४६ | - |
| ४६ | श्री. बिपीन दत्तात्रेय पाटील | २०२३ - | - | - |
| ४७ | श्री. प्रमोद गोपाळ दळवी | - | - | - |
| ४८ | श्री. दिलीप काशिनाथ राऊत | - | - | - |
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ सरचिटणीस
| अ.क्र. | पदाधिकारी नाव | पद कालावधी | जन्म | निधन |
|---|---|---|---|---|
| १ | कै. भास्कर कृष्णाजी पाटील | १९१४ - १९३७ | २०/०३/१९०२ | १५/०२/१९७३ |
| २ | कै. वामन केशव राऊत | - | १०/०३/१९२१ | १२/०२/१९९० |
| ३ | कै. महादेव नारायण महाले | - | १६/१२/१९०७ | १३/०८/१९९१ |
| ४ | कै. गोविंद रघुनाथ वैद्य | - | ०२/०९/१९०९ | ०६/०७/२००२ |
| ५ | कै. लक्ष्मण हिराजी वैद्य | - | २१/०२/१९२१ | २३/०३/२००४ |
| ६ | श्री. राजाराम गोविंद पाटील | - | २३/११/१९३५ | - |
| ७ | श्री. प्रभाकर गणपत पाटील | - | ०४/१२/१९३६ | - |
| ८ | श्री. जगन्नाथ हरी दळवी | - | २०/०१/१९६७ | ३०/०५/२०२५ |
| ९ | कै. यदुनाथ पांडुरंग देसले | १९९३ - १९९४ | २२/१०/१९४४ | ११/०९/२०२० |
| १० | कै. नारायण हरी पाटील | १९९५ - १९९६ | १८/११/१९२२ | १३/०१/२०२२ |
| ११ | श्री. कमळाकर गणपत पाटील | १९९४ - १९९५, १९९८ - १९९९ | १२/०७/१९४० | - |
| १२ | श्री. प्रमोद गोपाळ दळवी | १९९९ - २००० | २४/१२/१९५९ | - |
| १३ | श्री. जयंत पांडुरंग देसले | २००० - २००४/०५ | २४/०६/१९४८ | - |
| १४ | श्री. गंगाराम दत्तात्रय घरत | २००५ - २००६, २००६ - २००७, २००८ - २००९ | ०१/०६/१९६० | - |
| १५ | श्री. संतोष कृष्णा पावडे | २००७ - २००८, २००९ - २०१० | ०१/०६/१९६९ | - |
| १६ | श्री. विनोद बाळकृष्ण पाटील | - | ०१/०१/१९६५ | - |
| १७ | श्री. हरीश पांडुरंग वैद्य | - | १७/११/१९७३ | - |
| १८ | श्री. जयवंत हरिश्चंद्र राऊळ | - | २३/०३/१९६० | - |
| १९ | श्री. संजय परशुराम पाटील | - | ०७/०५/१९५३ | - |
| २० | श्री. प्रकाश वासुदेव राऊत | २१/०७/२०२५ | - | - |